28.4 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeलातूरकरकट्टा-खंडाळा रस्त्यावर महाराष्ट्रदिनी होणार ध्वजारोहण 

करकट्टा-खंडाळा रस्त्यावर महाराष्ट्रदिनी होणार ध्वजारोहण 

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील करकट्टा ते रस्त्याची अंत्यत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही आवघड झाल्याने या रस्त्याचे तात्काळ दुरूस्ती होणे आवश्यक आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी करकट्टा-खंडाळा-हिसोरी रस्ता कृती समितीच्यावतीने करकट्टा-खंडाळा रस्त्यावर गुरूवार दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी होणार ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर पंचायत समितीच्या उपकार्यकारी अभियंता सौ उषा मोतीपवळे, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांना कृती समितीने निवेदन दिले आहे.
लातूर तालुक्यातील करकट्टा खंडाळा हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लातूर अंतर्गत येतो. सदरील रस्ता हा ग्रामीण मार्ग आहे. चिंचोली, गोंदेगाव, शिराळा, पिंपरी (आंबा), हिसोरी, खंडाळा या परिसरातील जनतेसाठी व्यापार, शिक्षण, आरोग्य या मुख्य सुविधासाठी मुरुड हे जवळचे शहर आहे. पण सदरील रस्ता पूर्णपणे उखडल्यामुळे वरील गावातील जनतेला बोरगाव (काळे) इथून १० किलोमीटर अंतर जास्तीचे पार करून मुरुडला यावे लागते.
सदरील गावाने करकटा-खंडाळा-हिसोरी रस्ता कृती समिती स्थापन केलेली असून सदरील गावानी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन करकट्टा खंडाळा रस्ता एकदाच पूर्ण डांबरीकरण करावे, अशी मागणी त्या ठरावात घेतलेली आहे. करकट्टा खंडाळा या पूर्ण रस्त्याचे एकदा डांबरीकरण व्हावे म्हणून वारंवार मागणी करून सुद्धा सदरील मागणीकडे जिल्हा परिषद, लातूर दखल घेत नसल्यामुळे करकट्टा-खंडाळा-हिसोरी रस्ता कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र दिन गुरूवार दि. १ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता करकट्टा खंडाळा रस्त्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
या निवेदनावर समितीचे समन्वयक लक्ष्मीकांत तवले, चंद्रकांत शिंदे, कृष्णा शिंदे करकट्टा, भैरवनाथ झाडके, दत्ता शिंदे खंडाळा, जयचंद शिंदे, अशोक शिंदे हिसोरी, अजय काळे, राजसाहेब सवई शिराळा, सचिन देशमुख, संगमेश्वर स्वामी, अमोल देडे गोंदेगाव, सौदागर गायकवाड आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR