28.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रकरुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल लागताच धनंजय मुंडेंकडून खुलासा

करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल लागताच धनंजय मुंडेंकडून खुलासा

मुंबई : प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टाच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोर्टाला घरगुती हिंसाचाराचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. फक्त आर्थिक परिस्थिती पाहून कोर्टाने पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये रहात होतो, असे मुंडेंनी आधीच कोर्टात मान्य केले आहे, असे वकिलांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. तसेच कोर्टाने त्या धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी असल्याचेही मान्य केले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडून कोर्टाच्या निकालाबाबत खुलासा करण्यात आला आहे.

आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगीचा आहे. घरगुती हिंसाचार अजून कोर्टात सिध्द नाही.धनंजय मुंडेंनी काही चुकीचे केलेय, असे कोर्टाला काही आढळले नाही, असेही वकिलांनी स्पष्ट केले आहे. वांद्रे कोर्टाने पोटगीबाबत दिलेला निकाल करुणा मुंडे यांना मान्य नाही. त्यांनी याविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी वांद्रे कोर्टात १५ लाख रुपये पोटगीची मागणी केली होती. पण कोर्टाने दोन लाख रुपये पोटगीचे आदेश दिले आहेत. याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे करुणा मुंडेंनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR