27.5 C
Latur
Saturday, April 5, 2025
Homeराष्ट्रीयकर्नाटकमध्ये भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

कर्नाटकमध्ये भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

कर्नाटक : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. एका व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील नेलोगी क्रॉसजवळ शनिवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सर्वजण बागलकोट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने कलबुर्गी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कलबुर्गीचे पोलिस अधीक्षक ए. श्रीनिवासुलु यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी नेलोगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

सर्व लोक कलबुर्गी जिल्ह्यातील एका दर्ग्यात जात होते. पोलिसांनी सांगितले की ट्रकचे टायर पंक्चर झाले होते. तो रस्त्याच्या डाव्या बाजूला उभा होता. ड्रायव्हर टायर बदलण्यात व्यस्त होता. त्यानंतर प्रवाशांना दर्ग्याकडे घेऊन जाणा-या व्हॅनने मागून ट्रकला जोरात धडक दिली. कलबुर्गीचे पोलिस अधीक्षक ए. श्रीनिवासुलु म्हणाले की, अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहाजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर व्हॅनचालक घटनास्थळावरून पळून गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR