22.4 C
Latur
Wednesday, February 4, 2026
Homeलातूरकल्याण पाटील यांच्या नियोजनामुळे वाढवणा गटात पुन्हा काँग्रेसच!

कल्याण पाटील यांच्या नियोजनामुळे वाढवणा गटात पुन्हा काँग्रेसच!

उदगीर : प्रतिनिधी
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या जि. प. व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत वाढवणा जि. प. गटात  काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवार असलेले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चिमनदरे नागारोव तर वाढवणा पंस गणाच्या सौ सविता दत्तात्रय बामणे. हंडरगुळी गणाचे उमेदवार माधवराव माने यांना उमेदवारी दिली असून या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव तथा जि. प.. चे माजी सभापती कल्याण पाटील यांनी खांद्यावर घेती आहे. कल्याण पाटील यांच्या प्रचाराच्या योग्य नियोजना मुळे मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
वाढवणा जिल्हा परिषद गटात व गणात मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता काँग्रेस जोमाने वाटचाल करत असून याउलट विरोधक कोमात गेले आहेत त्यामुळे बाहेरचा उमेदवार लादलेला चालणार नाही. त्यामुळे कोमातच गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली असल्याने पुन्हा एकदा या गटात काँग्रेसचेच उमदवार विजयी होतील अशी चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक उमेदवार असलेले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नागारोव चिमनदरे तर वाढवणा पंस गणाच्या सौ सविता दत्तात्रय बामणे. हंडरगुळी गणाचे उमेदवार माधवराव माने यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. हे विशेष की, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक व साखर कारखाने यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी शेतक-यांचा व नागरिकांचा विकास करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला आता काँग्रेसचा वाढवणा गटावर विजयश्री खेचून आणून सर्वसामान्य नागरिकांना सोयी सुविधा पुरवणे हा एकमेव उद्देश असून जिल्हा परिषद हीच ग्रामीण भागातील विकासाची गुरुकिल्ली असल्याचे जागरूक नागरिकांतून चर्चा केली जात
आहे.
विकासासाठी कटीबद्ध असलेल्या कॉग्रेसच्या पाठीशी उभे रहावे आवाहन कॉर्नर बैठकीतून कॉग्रेसच्या स्टार प्रचारक कल्याण पाटील यांनी केले आहे. त्यामुळे बाहेरच्या लादलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले असून वाढवणा गटातून फक्त एकच नारा दिला जात आहे. बाहेरच्या आयात उमेदवाराला डावला आणि स्थानिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा असा मोलाचा संदेश मतदारांतून दिला जात आहे. त्यामुळे कॉग्रेसच्या विकासाचा रथ दौडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR