चाकूर : प्रतिनिधी
देशातील बळीराजा सुक्षी तर देश सुखी, असे प्रतिपादन कुलगुुरु डॉ इंद्र मणी यांनी केले.
येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात उद्योजक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात जवळपास १४० महिलांची उपस्थिती होती. महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसाय बाबत माहिती दिली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशाताई भिसे,अधीष्ठाता डॉ.भगवान आसेवार,अधीष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे,विस्तार कृषीशास्ञज्ञ डॉ.वसंत सुर्यवंशी,अधीष्ठाता डॉ.संतोष कांबळे, महादेव शेळके हे उपस्थित होते.
डॉ. इंद्र मणी यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने संवाद साधताना विविध विषयावर माहिती दिली. मराठवाड्यातील शेतकरी सतत आर्थिक संकटाचा त्यांना सामना करावा लागत आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ शेतक-यांच्या अडचणीबाबत अभ्यास करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतक-यांना लागणारे बी-बीयाणे तूर, हरभरा,सोयाबीन, ज्वारी, बाजरा,दाळ, गोदावरी व्हरायटीज सारख्या कडधान्यावर प्रक्रिया करून उत्पादन वाढविण्यासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करीत असल्याचे डॉ.इंद्र मणी म्हणाले. शेतकरी देवो भव: आज शेतकरीच आपल्या अन्न पिकवून देत असतो. शेतक-यांना पेरणीपासून आपल्या पिकांची रास करण्यापर्यंत अनेक संकटाचा सामना करावा लागतो.अतिवृष्टी,अतिपाऊस,अल्प पाऊस यामुळे शेतक-यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
माझा एक दिवस बळीराजासोबत ही संकल्पना आम्ही विद्यापिठाच्या माध्यमातून सुरू केली आहे.बळीराजाचे उत्पन्न वाढ कशी होईल यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे. शेतक-यांशी जोडुन त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हाच उद्देश आहे. सेद्रीय शेती करण्यावर भर द्यावे असे आवाहन केले आहे. आमचे कार्यक्षेत्र मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये आहे. शेतक-यांना पेरण्यासाठी लागणारे सोयाबीन, तुर, हरभरा, रास होईपर्यंत तीन वर्ष बी-बीयाणे न बदलाता तेच बीयाणे वापरावे, असे म्हणाले. कार्यक्रमांचे प्रस्ताविक अधीष्ठाता डॉ.संतोष कांबळे यांनी केले. सुञसंचलन डॉ.ज्योती झिरमिरे यांनी केले. तर आभार सुनील राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अभिषेक राठोड, अधीक्षक आशिष महेंद्रकर, पितांबर पिरंगे, सादिकमियाँ हरणमारे, कैलास शिंदे,निखिल सुर्यवंशी, शिवानंद चिकाळे,विष्णू कांबळे, वाजिद शेख आदींनी परिश्रम घेतले.