अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’ने एलिसा कार्सन ही मंगळ ग्रहावर जाणारी पहिली व्यक्ती असेल असे ४ जानेवारी २०२४ रोजी सांगितले. लहानपणापासूनच स्पेस कॅम्पमध्ये सहभागी होणा-या एलिसाने लहानपणीच अंतराळवीर होण्याचे ठरविले होते. लहानपणीच्या तिच्या सर्व अभ्यासक्रमात अंतराळ हा विषय असायचा.मायक्रोग्रॅव्हिटी उड्डाणे, विमान चालविण्याचे प्रशिक्षण आणि ज्या गोष्टी अंतराळवीर होण्यासाठी गरजेच्या असतात त्याचा अभ्यास तिने अत्यंत गांभीर्याने केला. अंतराळवीर व्हायचे असेल तर विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि गणित म्हणजेच ‘एसटीईएम’च्या क्षेत्रात मास्टर पदवी घ्यावी लागेल, हे तिला कळून चुकले होते. त्यामुळे तिची निवड अत्यंत सार्थ ठरणारी आहे.
ता ती वेळ जवळ आलीय की जेव्हा रॉकेटच्या चेंबरमध्ये बसून एखादा अंतराळवीर मंगळ ग्रहाकडे रवाना होईल. २०१३ मध्ये जेव्हा अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळ ग्रहावर जाण्यासाठी उत्सुक असलेल्या नव्या पिढीकडून नावे मागविली तेव्हा हजारो विद्यार्थ्यांनी उत्साह दाखविला आणि अनेकांनी मंगळावर जाण्याची तयारी दर्शविली. यादरम्यान नासाने २०१३ मध्ये एलिसा कार्सनला ‘मिशन मार्स’साठी निवडले. दहा वर्षांपूर्वी आणि आताही या मंगळ मोहिमेबाबत बराच संभ्रम होता. कारण सद्यस्थितीत एखादा व्यक्ती मंगळावर पोचेल, असा विचारही कोणाच्या मनाला शिवत नव्हता. परंतु ४ जानेवारी २०२४ रोजी नासाने याबाबत स्पष्टीकरण देत मंगळ ग्रहावर जाणारी एलिसा कार्सन ही पहिली व्यक्ती असेल असे सांगितले. अर्थात नासाने घोषित करण्यापूर्वी लोकांनी कार्सनच मंगळ ग्रहावर जाईल, असे भाकित केले होते. कारण एलिसाच्या अंगी असणारे गुण, जिद्द पाहता तीच मंगळ ग्रहावर जाण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले होते.
तसे तिला प्रशिक्षणही मिळत आहे. वास्तविक एलिसाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे स्वत:ला खूपच कमी वयात ध्येय गाठण्यासाठी तयार केले. २०१३ मध्ये तिची या अभियानासाठी निवड करण्यात आली, तेव्हा नासा देखील या संभाव्य प्रवासाच्या तयारीला लागले होते. एलिसाने २०१३ च्या अगोदर नासाच्या सर्व १४ व्हिजिटर सेंटरला भेट दिली होती. या ठिकाणी सामान्यपणे विद्यार्थी आणि अंतराळ विज्ञानाची आवड असणारी मंडळी भेट देत असतात. नासाचे १४ व्हिजिटर सेंटर फिरल्यानंतर एलिसा कार्सन ही नासा पासपोर्ट प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली व्यक्ती बनली. लहानपणापासूनच स्पेस कॅम्पमध्ये सहभागी होणा-या एलिसाने लहानपणीच अंतराळवीर होण्याचे ठरविले होते. काही दिवसांपूर्वी याबाबतची घोषणा झाल्यानंतर माध्यमांची तिची मुलाखत घेण्यासाठी गर्दी उसळली आणि ते तिने बाळगलेल्या स्वप्नाचे क्लिप्स प्रसारित करू लागले. एप्रिल २०२१ मधील एका मुलाखतीत तिने आपल्या स्वप्नाबाबत आणि भवितव्याबाबतच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. एलिसा कार्सन म्हणाली, आपण मूळ रूपाने बॅटन रूज लुइसियानातील आहोत.
फ्लोरिडा टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये अॅस्ट्रोबायोलॉजीचा अभ्यास करत असून तिने अॅस्ट्रोबायोलॉजिस्ट होण्याची आशा बाळगली होती. साहजिकच शेवटचे स्वप्न हे अंतराळवीर होण्याचे आहे आणि ते लहानपणापासूनच ठरविले आहे. कदाचित या ध्येयामुळेच तिने अभ्यासक्रमही याच विषयाचा निवडला. ती म्हणते, मला लहानपणापासूनच अंतराळवीर होण्याची इच्छा होती. विशेषत: मंगळ ग्रहावर जाण्यासाठी इच्छुक होते. यासंदर्भात आपण वडिलांना प्रश्नही विचारला. मंगळ ग्रहावर कोणी गेले आहे का? असे विचारले असता त्यांनी मला चंद्राबाबत थोडी माहिती दिली होती. त्याचवेळी आपण एकना एक दिवस मंगळ ग्रहावर जाऊ, अशी कल्पना केली. या वेडापायी ‘मिशन टू मार्स’ नावाचे पोस्टर तिने तयार केले आणि ते तिच्या खोलीत लावले होते. तिला याबाबत फारशी माहिती नव्हती. एलिसाला लहानपणापासूनच अंतराळवीर होण्याचे वेड होते आणि ती त्याच धुंदीत असायची. त्यामुळे ती अंतराळाशी संबंधित शिबिरांना उपस्थित राहत असे. अशा रीतीने अंतराळ विज्ञानाची आवड ही वाढतच गेली. या काळात ती अंतराळाबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी झपाटली होती. लहानपणीच्या सर्व अभ्यासक्रमांत अंतराळ हा विषय असायचा.
मायक्रोग्रॅव्हिटी उड्डाणे, विमान चालविण्याचे प्रशिक्षण आणि ज्या गोष्टी अंतराळवीर होण्यासाठी गरजेच्या असतात त्याचा अभ्यास तिने अत्यंत गांभीर्याने केला. अंतराळवीर व्हायचे असेल तर विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि गणित म्हणजेच ‘एसटीईएम’च्या क्षेत्रात मास्टर पदवी घ्यावी लागेल, हे तिला कळून चुकले होते. म्हणून तिने अभ्यासासाठी अॅस्ट्रोबायोलॉजीचा विषय निवडला. एलिसाने लहानपणापासून मंगळ ग्रहाबाबत अधिकाधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. वयाच्या १६ व्या वर्षी मंगळ मिशनसाठी आवश्यक असणारी सर्व तांत्रिक माहिती जाणून घेतली होती. साहजिकच यात ‘नासा’च्या प्रशिक्षणाचे देखील योगदान होते. मात्र खरी गोष्ट ही तिच्या झपाटलेल्या ध्येयाची होती. २३ वर्षीय एलिसा कार्सन आता अधिकृतरीत्या नासाने जाहीर केलेल्या मंगल मिशनसाठी पहिली अंतराळवीर असणार आहे. १० मार्च २००१ मध्ये जन्मलेली एलिसा ही लहानपणापासूनच अंतराळवीर होण्यासाठी उत्सुक राहिली आहे आणि ती आता डॉक्टरेटचा अभ्यास करत आहे. मंगळ ग्रहावर जाणा-या व्यक्तीसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी तिने पूर्ण केली आहे. वॉटर सर्वाइव्हल ट्रेनिंगबरोबरच स्कूबा सर्टिफिकेशन आणि डिकम्प्रेशनचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. २०२३ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदवी मिळवल्यानंतर सध्या ती अराकान्स येथे विद्यापीठात अंतराळ आणि ग्रहविज्ञान शास्त्रात पीएच.डी करत आहे.
अमेरिकेतील जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी तिच्या दोन दोन मुलाखती प्रकाशित केल्या. बर्ट कार्सन यांची एकुलती एक लेक असणा-या एलिसाने वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा हंट्सविले अलबामा येथील अंतरिक्ष शिबिरात सहभाग नोंदविला. त्यानंतर आणखी सहा शिबिरात सहभागी होऊन ती केवळ अमेरिकेतीलच नाही तर तिने तुर्की आणि कॅनडातील नासा शिबिरातही उपस्थिती दर्शविली. अशा रीतीने सर्व शिबिरांत सहभाग घेणारी ती एकमेव युवती ठरली. तिने अंतराळवीरांशी संबंधित ‘एमआयटी’च्या ‘सॅली राईड समर कॅम्प’मध्ये देखील सहभाग घेतला. वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत तिने ‘प्रोजेक्ट पोलर सबऑर्बिटल सायन्स इन अपर मेसोस्फीयर स्पेस’ अकादमीत सहभाग घेतला होता. तसेच वयाच्या १८ व्या वर्षी तिने वैमानिकाचा परवानाही मिळवला. मंगळ ग्रहावर जिवंत राहण्यासाठी अंतराळवीरांना कराव्या लागणा-या सर्व गोष्टी आणि खुबी तिने आत्मसात केल्या. तिने अॅम्ब्री रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीत अंतराळ शरीरक्रिया विज्ञान आधारित वर्गातही सहभाग नोंदविला होता. २०१३ मध्येच नासा पासपोर्टचा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर तिला वॉशिंग्टन डीसी येथील स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर-१० पॅनलमध्ये पॅनालिस्ट होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तसेच ‘स्टीव्ह हॉर्वे टॉक शो’मध्ये तिला सर्वांत कमी वयाची ग्राऊंड ब्रेकरच्या रूपाने सादर करण्यात आले.
२०१७ मध्ये लघुपट ‘द मार्स जनरेशन’मध्ये तिला दाखविण्यात आले. २०१९ रोजीच्या कार्सन रायन यांच्या मिस्ट्री प्लेडेटच्या एका भागात ती चमकली होती. अंतराळवीर होण्यासाठी आणि मंगळ ग्रहाचा प्रवास करण्याचे लहानपणीच स्वप्न बाळगलेली एलिसा कार्सन ही पहिल्यापासूनच माध्यमासाठी लोकप्रिय व्यक्ती होती. २०२८ मधील नासाच्या ‘मार्स अॅटमॉसफियर अॅह व्होलटाय इव्होल्युशन मिशन’मध्ये ती सहभागी असणार आहे. ते जून २०२८ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत मंगळ ग्रहावरचे काही नमुने पृथ्वीवर पोचतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर २०३३ मध्ये नासाची मंगळ ग्रहावर व्यक्ती पाठविण्याची योजना असून त्यात एलिसा कार्सन असेल.
कहाणी पहिल्या मंगळयात्रीची