मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करत आहे. काँग्रेसने आज त्यांची दुसरी २३ जागांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीत त्यांनी ४८ जागांची यादी जाहीर केली होती. त्याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडशी चर्चा करून ही यादी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, दुस-या यादीनंतर आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत.
काँग्रेसची दुसरी यादी
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलीप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील