काँग्रेसची देशभर निदर्शने

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि अटकेच्या मागणीसाठी काँगे्रसने सोमवारी देशभरात एल्गार पुकारला. मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) प्रक्रियेतील कथित घोटाळे आणि अंतर्गत गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. आग््रयात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या घराला काळे फासून, शाईफेक करून ‘ज्ञानेश कुमार गद्दार, मतचोर’ असे लिहून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राजस्थानात पायी मोर्चा काढणारे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. निवडणूक आयोगाच्या अंतर्गत रचनेत आणि मतदार याद्यांमध्ये नाव वाढवणे/वगळणे याबाबत इतर दोन निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी) ज्ञानेश कुमार यांच्या काही एकतर्फी व घाईघाईने घेतलेल्या निर्णयांवर लेखी आक्षेप घेतले होते.

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचा असा आरोप आहे की, ज्ञानेश कुमार हे इतर आयुक्तांचे न ऐकता मनमानी पद्धतीने काम करत असून त्यांनी विरोधी पक्षांचे मतदार वगळण्याचे घटनाबा पाऊल उचलले आहे, जे देशद्रोहासारखे आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी सुरू केली आहे. लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांशी भिडले तर काशी, वाराणसीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बांगड्या घेऊन आंदोलन केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उत्तर प्रदेशात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. जयपूरमध्ये शहीद स्मारक येथे सभा झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. मध्य प्रदेशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या विरोधात भोपाळमध्ये काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. या दरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. काही कार्यकर्ते बॅरिकेड्सवरही चढले तसेच प्रतीकात्मकरीत्या ज्ञानेश कुमारांना बेड्याही घालण्यात आल्या. बिहार मतचोरीविरोधात बिहारमध्ये काँग्रेसने हल्लाबोल करत पाटणा-औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चा काढला.

ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारावर गंभीर आक्षेप घेत महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस समितीच्या वतीने अनेक भागात आंदोलने करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांना त्वरित पदावरून हटवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला. ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी तब्बल १४ वेळा आक्षेप नोंदवूनही ज्ञानेश कुमार यांनी हुकूमशाही पद्धत राबविली आहे. हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढण्यात आली. यावेळी ‘एसआयआर हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देण्यात आल्या. हिंगोलीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुमारे दहा मिनिटे रोखला.

शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. याच दरम्यान महसूल मंत्र्यांचा ताफा कार्यालयासमोरून जात असताना त्यांचा ताफा रोखण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांना निवेदन दिले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात विरोधी पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त विरोधी पक्षांना संपवण्यासाठी केंद्र सरकारचे बाहुले म्हणून काम करत आहेत हे आता उघड झाले आहे. मतदार यादीतील एक नाव वगळणे म्हणजे नागरिकाच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणणे आहे. ‘एसआयआर’मधून १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. टी.एन. शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाचा जो धाक आणि विश्वास होता तो आता राहिलेला नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33

Latest news