लातूर : प्रतिनिधी
जे जे नवे ते ते लातूरला आणायचे असेल तर काँग्रेस, महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्लीत पाठवणे गरजेचे आहे. काँग्रेसला मतदान म्हणजे लातूरच्या विकासाला मतदान आहे, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांनी येथे केले. लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण मतदारसंघातील भातांगळी, बोरी, काटगाव, गाधवड, तांदुळजा, चिंचोली ब., गातेगाव पंचायत समिती गणातील विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार धिरज देशमुख बोलत होते.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, भाजप सरकार केवळ मोठ मोठी आश्वासने आणि भपकेबाज जाहिरातीवर चालत आहे. जनतेचा विकासही ते जाहिरातीतूनच दाखवतात. प्रत्यक्षात काहीही नसते. कुठलीही आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत. आश्वासने का पूर्ण केली नाहीत, असे विचारले तर ‘ती जुमलेबाजी होती’, असे ते सांगतात. जनतेची दिशाभूल करणा-या अशा फसव्या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा. डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, एका शेतक-याच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी मिळाली. याबद्दल मी काँग्रेसचे, पक्षातील सर्व नेत्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी आता आशीर्वादरुपी मतदान करून मला विजयी करावे आणि सुडाचे राजकारण करणा-यांना जनतेची दिशाभूल करणा-या भाजपला योग्य जागा दाखवून द्यावी, असे मी आवाहन करतो.
यावेळी किरण जाधव, जगदीश बावणे, सुनील पडिले, अनुप शेळके, रविंद्र काळे, सचिन दाताळ, सुभाष घोडके, इम्रान सय्यद, कैलास पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, दैवशाला राजमाने, धनंजय देशमुख, राजकुमार पाटील, रघुनाथ शिंदे, प्रवीण पाटील, अरुण कुलकर्णी, सत्तार पटेल, मदन भिसे, गोविंद बोराडे, अनंत बारबोले, लक्ष्मण पाटील, अनिल पाटील, जयचंद भिसे, विरसेन भोसले, अमृत जाधव, नंदकुमार देशमुख, वैजनाथ दिवटे, श्रीरंग जटाळ, सतीश पाटील, दगडूसाहेब पडिले, संभाजी रेड्डी, युवराज पाटील, श्रीरंग दाताळ, जितेंद्र स्वामी, धनराज दाताळ, बोगदाद सगरे, बाबू शेख, शब्बीर सय्यद, हरिभाऊ गोणे, कमलाकर अनंतवाड, बालाजी वाघमारे, रघुनाथ शिंदे, कैलास पाटील, मनोज पाटील, शंकर बोळंगे, सरवर शेख, राजेसाहेब पाटील, परमेश्वर पाटील, वाल्मिक माडे, शंकर पाटील, संजय ढोले, महादेव काळे, अशोक काळे, नरंिसग बुलबुले, भैरवनाथ सव्वासे, महारुद्र चौंडे, भीमाशंकर शेटे, महेंद्र भादेकर, बालाजी सुरवसे, सुभाष जाधव, नवनाथ कळबंडे, भाऊसाहेब कावळे, किसनराव लोमटे, महेश अन्नदाते, व्यंकट पिसाळ, विनीता बावणे, माणिकराव भोळे, उस्मान पठाण, संजय चव्हाण, बंकट कदम, दौलतराव कदम, रणजित भिसे, अशोक भिसे, इरफान शेख, नवनाथ शिंदे, अण्णासाहेब भिसे, संभाजी भिसे, साहेबराव पाखरे, निवृती भिसे, गणेश कदम, प्रताप खोसे, शिवाजी देशमुख, शाहूराज पवार, गोवर्धन मोरे, नानासाहेब गायकवाड, सिद्राम गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.