27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरकाँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार, जिल्हाध्यक्षांची बैठक माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची उपस्थिती

काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार, जिल्हाध्यक्षांची बैठक माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची उपस्थिती

लातूर : प्रतिनिधी
बुधवार दि. २७ नोव्हेबर २०२४ रोजी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत टिळक भवन मुंबई येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदार व जिल्हाध्यक्षांच्या बैठकीस राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख उपस्थित राहीले. विधानसभा निवडणूक निकाला नंतर पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठीच्या चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ  पटोले यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित विधानसभा सदस्य व नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे संबंधित जिल्हाध्यक्ष यांची बैठक  बुधवार, दि. २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी दुपारी १.०० वा. टिळक भवन, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली.
 या बैठकीस राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख उपस्थिती राहीले, काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणूक
निकालानंतरची पुढील रणनीती ठरवण्यासाठीच्या चर्चेत सहभाग घेतला. विधानसभा निवडणूकीत काँग्रेस महाविकास आघाडीला झालेले मतदान, या अनुषंगाने पूढील काळातील नियोजन बाबत चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक  कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे स्वागत केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR