लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांनी दाखविलेल्या विकासाच्या वाटेवरुन मार्गाक्रमण करीत असलेले लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी प्रामाणिकपणे लातूर शहर व लातूर ग्रामीणचा सर्वांगीण विकास केला आहे. विकासाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी तमाम मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूण माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांचे हात बळकट करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सौ. वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले. यावेळी रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धिरज देशमुख, सुनिताताई अरळीकर, शितलताई फुटाणे, कलावतीताई कदम, सुप्रभात पाटील, माधुरीताई कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, मागील दहा वर्षात भाजपा महायुती सरकारने खोटी आश्वासने देत जनतेची फसवणूक केली आहे. विदेशातील काळा पैसा आपल्या देशात आणून शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब यांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देऊन, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी दुस-या पाच वर्षात सुशिक्षीतांना दोन कोटी नोक-या देण्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी दहा वर्षात त्यांना नोकरी दिली नाही. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवले. आपल्या युवक, युवतींना बेरोजगार बनवले. त्यामुळे आता सर्व मतदार बंधू-भगिनींनी महायुती सरकारच्या आश्वासनाला बळी न पडता आपल्या अडीअडचणी जाणून घेणा-या, आपल्या सुख-दु:खात सामील असणा-या काँग्रेस महाविकास आघाडीला खंबीरपणे साथ देत आपल्याला अमित देशमुख व धिरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
रीड लातूरचा संस्थापिका सौ. दीपशिखा धिरज देशमुख म्हणाले, पाच वर्षांपूर्वी आपण दिलेल्या आशीर्वादाने आमदार धिरज देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले. यंदाही आमदार धिरज देशमुख यांना मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी सीमा थोरात, मनीषा देवकते, अज्ञानबाई चिकाटे, दिलशाद पठाण, सुमनबाई शिंदे, झुंबरबाई शिंदे, मनीषा माने, सुनीता दळवे, शिल्पा थोरात, शारदा स्वामी, मधुबाला होळे, लक्ष्मी गवळी, लक्ष्मी शिंदे, कमलताई शिंदे, सुमनताई शिंदे, गयाबाई घोडके, राजश्रीताई शिंदे, निर्मलाताई गरड, बबीता बेले, सुनीता बेले, गीतांजली शिंदे, ज्योती शिंदे, निर्मला गरड, लक्ष्मी गरड, रत्नाताई शिंदे, बबीता बेले, सरोजा गरड, पुजा वाघमारे, शिवकांता वागळे, सीमाबाई जाधव, बालिका जाधव, सुमित्रा वाकडे, महादेवी कांबळे, विटाबाई लोंढे, रेणुका दाभाडे, शोभा कांबळे, मुमताज शेख, संगीता कांबळ, मनीषा बकडे, छकुला कांबळे, जनाबाई जाधव, मंदाबाई कांबळे, जुबेदाबी शेख, बानु शेख, सागरबाई जाधव, सीता जाधव आदीसह महिला व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळ उपस्थित होते.
साई येथे शुक्रवारी सायंकाळी पदयात्रा आणि संवाद बैठक झाली. यावेळी सुमित्राताई माने, अमोलजी पवार, कांचनताई पवार, पुष्पाताई पवार, पूजाताई पवार, लिंबराज पवार, ज्ञानेश्वर पवार, राहुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अश्विनी पवार, वैष्णवी पवार, सुधामती पवार, अमृता पवार, विद्या पवार, बालिका पवार, सुशीला पवार, आशा पवार, अनुसया जाधव, अंजली पवार, आशा गिरी, कोमल पवार, सुरेखा पवार, मीरा पवार, अनुसया पवार, राऊबाई पवार, शीला पवार, संगीता पवार आदी महिला व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.