27.5 C
Latur
Wednesday, October 8, 2025
Homeमनोरंजन‘कांतारा’च्या लाटेत ‘दशावतार’ मजबुतीने उभा!

‘कांतारा’च्या लाटेत ‘दशावतार’ मजबुतीने उभा!

मुंबई : भपकेबाज ‘कांतारा’ चित्रपटाच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ने आपला गड उत्तमरीत्या राखून ठेवला आहे. ‘कांतारा’च्या बरोबर आलेल्या बॉलिवूडच्या चित्रपटाला कांताराने धडक दिली असली, तरी ‘दशावतार’ने चौथ्या आठवड्यातही आपले स्थान हलू दिलेले नाही. चौथ्या आठवड्यातसुद्धा ‘दशावतार’चे सुमारे दीडशेच्यावर शो तुफान गर्दीत सुरू आहेत. हीच मराठीतील सकस कथेची, अर्थपूर्ण मराठी चित्रपटाची आणि सुजाण मायबाप रसिकांच्या प्रेमाची ताकद आहे.

ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या ‘दशावतार’ चित्रपटाने गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा धो-धो वर्षाव पाहिला. अमेरिकेत शंभरहून जास्त शो होत आहेत, तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देश येथे ‘दशावतार’ने आपला झेंडा फडकवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ब-­याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळाले. ‘दशावतार’मुळे चित्रपटगृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली.

कोकणातील अनेक बंद चित्रपटगृहांची दारे ‘दशावतार’ने पुन्हा उघडली. तर पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कोकणातील चित्रपटगृहांनी एकट्या ‘दशावतार’वर कमावले. काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर ‘दशावतार’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले. या चित्रपटाने लोकांचा उदंड प्रतिसाद तर मिळवलाच, पण मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळात ‘दशावतार’ची खूप प्रशंसा झाली. अशा रीतीने मराठी चित्रपट उद्योगाला आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम ‘दशावतार’ चित्रपटाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR