नाशिक : प्रतिनिधी
सद्यस्थितीत कांद्याच्या किमतीतील चढ-उतार हा शेतक-यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्या देशभरातील बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर मंदावलेले असताना, होळी जवळ येताच कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने कांद्याचे दर पुन्हा वाढू शकतात, असे व्यापा-यांचे मत आहे. गेल्यावर्षी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने कांदा पिकाचे नुकसान झाले होते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये उन्हाळी कांद्याला ४ हजार १४१ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता.
त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो कांदा खरेदी करण्यासाठी ७५ ते ८० रुपये मोजावे लागायचे. यानंतर मात्र गत तीन महिन्यांपासून पावसाळी लाल कांद्याची आवक वाढल्याने दर काहीसे खाली आले.