पुणे : प्रतिनिधी
मागील सप्ताहात राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारात लेट खरीप कांद्याची आवक घटल्यानं कांदा दरात सुधारणा होती. तर चालू सप्ताहात पुन्हा आवक वाढल्याने दर पुन्हा घसरले आहेत. मागील सप्ताहात सरासरी ३,००० रुपय क्विंटल होते. हेच दर टप्प्याटप्प्याने कमी होऊन, प्रति क्विंटल २,३२५ रुपये दर मिळाले. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लेट खरीप कांद्याला किमान २०० रुपयांपासून, कमाल ३,४०० रुपयांपर्यंत, तर सरासरी २,१०० ते २,२०० रुपये दर मिळत आहेत.
राज्यात विविध भागात कांदा काढणी सुरू आहे. येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे. परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली. यामुळं शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्यानं शेतकरी बेजार झाले आहेत. उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्यानं दरात मोठा उतार आला आहे.
दीड हजार रुपये क्विंटलपर्यंत दर घसरला आहे. धुळे जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारत असून अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात. जिल्ह्यातील कांदा इंदौर, नाशिक, मुंबई, गुजराथच्या बाजार समितीत जातो. यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे असून त्यातच मागील १५ दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक अधिक असल्यानं दरात उतार आला आहे. महिन्यापूर्वी कांद्याला क्विंटलला चार हजारांपर्यंत भाव मिळत होता. मागील १० दिवसांपूर्वी अडीच हजार रुपये क्विंटलने कांदा विकला. पण, सध्या तर १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे. यामुळं शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतक-यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.
शेतक-यांना भाव मिळवून देण्याची मागणी : धुळे जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारत असून अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात. जिल्ह्यातील कांदा इंदौर, नाशिक, मुंबई, गुजरातच्या बाजार समितीत जातो. यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे असून त्यातच मागील १५ दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक अधिक असल्यानं दरात उतार आला आहे. महिन्यापूर्वी कांद्याला क्विंटलला चार हजारांपर्यंत भाव मिळत होता. मागील १० दिवसांपूर्वी अडीच हजार रुपये क्विंटलने कांदा विकला. पण, सध्या तर १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे. यामुळं शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतक-यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.