17.6 C
Latur
Thursday, November 27, 2025
Homeलातूरकाटेजवळग्यात एकाच रात्री चोरट्यांनी फोडली ५ घरे 

काटेजवळग्यात एकाच रात्री चोरट्यांनी फोडली ५ घरे 

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील काटेजवळगा येथे मध्यरात्री झालेल्या धाडशी चोरीत चोरट्यांनी एकाच रात्री पाच घरे फोडून धाडसी चोरी करीत पोलीस प्रशासनाला आव्हान दिले आहे .यात सोने, चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून श्वान पथक व ंिफंगर प्रिट्स घेतल्या आहेत. पोलिसांना चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही.
दि ७ रोजी मध्यरात्री निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथील रवींद्र जोशी यांचे घरफोडून चोरट्यांने सोने चांदीच्या दागन्यिासह रोख रक्कम लंपास करीत धाडसी चोरी केली आहे.  याशिवाय इतर चार घरी फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती कळताच निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक काटेजवळगा गावात पाठविले .
नांदेड येथील श्वान पथक व बोटांची ठसे घेण्यात आलेले आहेत परंतु श्वान पथकाने गावच्या बाहेर जाणा-या पाणंद रस्त्यापर्यंत मार्ग काढाला आणि तिथेच थांबले. यामुळे चोर याच मार्गे पळून गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या धाडसी चोरीमुळे काटेजवळगा व परीसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे रात्री पोलिसांनी गस्त घालण्याची नागरिकातून मागणी होत आहे.  सदर घटनेची रवींद्र रमेश जोशी यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या मार्गदर्शनखाली पोउपनि  सुरवसे, पोहे शरद माने, पोना गोपाळ बरडे हे करीत आहेत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR