22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरकारेवाडीतील ग्रामपंचायत इमारतीचा गिलावा निखळला

कारेवाडीतील ग्रामपंचायत इमारतीचा गिलावा निखळला

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील कारेवाडी ग्रामपंचायतची इमारत खिळखिळी झाली असून इमारतीचा गिलावा पडत असतानाच गुरुवारी संततधार पावसात इमारतीचा स्लॅब चा काही भाग कोसळून पडला.यात सुदैवाने हानी झाली नाही.मात्र इमारत धोकादायक झाल्याने भितीच्या वातावरणातच गाव कारभारी छताकडे पाहत गावचा कारभार करीत आहेत.
    गाव विकासासाठी ग्रामपंचायत ही केंद्रंिबदू असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाची ध्येय- धोरणे ठरविली जातात. त्यामुळे विविध कामानिमित्ताने गावातील नागरिकांची सतत वर्दळ असते मात्र गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारतीचा स्लॅब निखळून पडत असताना यात बसून गावचा कारभार कसा हाकावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान तालुक्यातील कारेवाडी ग्रामपंचायतची इमारत बांधकाम होऊन अडीच दशकाहून अधिकचा काळ झाला. त्यामुळे ही इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. अशात गेल्या सात दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसात गुरुवारी ग्रामपंचायत इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळला. यात जीवित हानी झाली नाही मात्र स्लॅबचे तुकडे कोसळत असताना ग्रामपंचायत कार्यालयात बसून काम करण्यासाठी भिंती वाटत असल्याने या इमारतीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR