28.7 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeलातूरकार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुळ ताकदीला नवी ऊर्जा द्यावी : अभय छाजेड

कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुळ ताकदीला नवी ऊर्जा द्यावी : अभय छाजेड

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे व लातूरचे निरीक्षक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभय छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १२ एप्रिल रोजी लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक लातूर येथील काँग्रेस भवनात झाली. या बैठकीत पक्षाच्या विविध कार्यांवरील योजना, राज्याची सद्यस्थिती आणि आगामी काळात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूरचे निरीक्षक अभय छाजेड यांनी कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुळ ताकदीला नवी ऊर्जा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सर्व पक्ष कार्यकर्त्यांना एकजुटीने आणि समर्पित भावनेने काम करण्याचे कळकळीचे आवाहन केले. ते म्हणाले, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांची अथक मेहनत यांच्या बळावरच माझा विजय लोकसभेला निश्चित झाला. येणा-या काळात कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका आपण एक दिलाने लढून निश्चितच जिंकूया, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूरचे निरीक्षक अभय छाजेड यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले,  लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या विचारांचा समृद्ध वारसा जतन करत काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आगामी काळात अधिक सक्रियपणे कार्य केले पाहिजे. काँग्रेसच्या मूळ ताकदीला नवी ऊर्जा देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. सामान्य जनतेच्या समस्या आणि अडचणी लक्षपूर्वक ऐकून त्यावर त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करणे हाच आपला प्रमुख धर्म आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरात जिल्हा स्तरावर निरीक्षक नेमून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे आणि याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज लातूर शहर व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीची ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीत लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी निरीक्षकांसमोर आपापल्या कार्यक्षेत्रातील कामांचा विस्तृत अहवाल सादर केला. त्यानंतर तालुकाध्यक्षांनी, शहराध्यक्षांनी आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षांनी आपापल्या तालुक्याचा, शहराचा आणि संघटनेचा तपशीलवार अहवाल अभय छाजेड यांच्यासमोर मांडला. याप्रसंगी पक्ष संघटनेची आतापर्यंतची प्रगती, आगामी निवडणुकांची तयारी आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणा-या जनजागृती अभियानांवरही सखोल चर्चा झाली. बैठकीच्या अखेरीस, उपस्थितांपैकी प्रत्येकाने पक्षाच्या उदात्त विचारधारेनुसार निस्वार्थ भावनेने जनसेवा करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
या आढावा बैठकीला मोईज शेख, अभय साळुंके, अमर खानापुरे, अ‍ॅड. समद पटेल, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, शिलाताई पाटील, स्मिताताई खानापुरे, इम्रान सय्यद, सुवर्ण जगताप, चंद्रकांत धायगुडे, विजयकुमार साबदे, अनिल चव्हाण, प्रा. एकनाथ पाटील, अ‍ॅड. प्रमोद जाधव,  दगडूप्पा मिटकरी, प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अरविंद भातांबरे, मारोती पांडे, अजित माने, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील उजेडकर, अजित बेळकोने, प्रविण पाटील, पंकज शेळके, अ‍ॅड. राजकुमार गायकवाड, कल्याण पाटील, कैलास कांबळे, अ‍ॅड. फारुख शेख, सुभाष घोडके, सहदेव मस्के, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, आसिफ बागवान, अ‍ॅड. शरद देशमुख, रामराजे काळे, खुंदमिर मुल्ला, ख्वॉजपाशा शेख, सिराजउद्दीन जहागीरदार, शेख कलीम, अ‍ॅड. सचिन पंचाक्षरी, अ‍ॅड. अंगदराव गायकवाड, विजय गायकवाड, सिकंदर पटेल, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, बालाजी झिपरे, अभिजित इगे, पिराजी साठे, महेश कोळळे, अ‍ॅड. विजय गायकवाड, अ‍ॅड. सुनीत खंडागळे, धनंजय शेळके, निजाम शेख, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, खाजामीया शेख, तबरेज तांबोळी, भाऊसाहेब भडीकर, पप्पूभाई शेख, पवनकुमार गायकवाड, विजय टाकेकर, वाघमारेताई, सुलेखाताई कारेपूरकर, सायरा पठाण, तनुजाताई कांबळे, राजू गवळी, अमोल बनसोडे, दीपक बनसोडे,  मैनुभाई शेख, अफसर कुरेशी, धनराज गायकवाड, करीम तांबोळी, किरण बनसोडे, राजू गवळी, पवन बनसोडे, आकाश मगर, काशिनाथ वाघमारे, नितीन कांबळे, करण गायकवाड यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR