36.1 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रकार चालवत असताना हार्ट अ‍ॅटॅक; भरधाव गाडीची ९ वाहनांना धडक 

कार चालवत असताना हार्ट अ‍ॅटॅक; भरधाव गाडीची ९ वाहनांना धडक 

कोल्हापूर : प्रतिनिधी
कार चालवत असताना गाडीचालकाला हार्ट अ‍ॅटॅक आला आणि त्यानंतर भीषण अपघात घडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील टेंबलाई नाका चौक येथून राजारामपुरीच्या दिशेने जाणा-या फ्लायओव्हरजवळ हा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत उद्योजक धीरज पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उद्योजक धीरज पाटील हे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या कारने प्रवास करत होते. रात्रीच्या सुमारास त्यांनी हॉटेलमध्ये जेवण केले त्यानंतर आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले. राजारामपुरीच्या दिशेने जाताना उड्डाणपुलाजवळ गाडी येण्यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

धीरज पाटील यांची गाडी भरधाव वेगात होती आणि त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्याच्या शेजारील वाहनांना जोरदार धडक दिली. धीरज पाटील यांच्या कारने रस्त्याच्या शेजारील रिक्षा, मोपेड आणि इतर बाईक्सला जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कारने रस्त्याच्या शेजारील वाहनांना दिलेली धडक इतकी जोरदार होती की, गाड्या उलट्या-पालट्या झाल्या. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने धीरज पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR