26.6 C
Latur
Monday, March 24, 2025
Homeमहाराष्ट्रकार डिव्हायडरला धडकली, ५ वर्षांच्या चिमुरडीसह दोघांचा मृत्यू

कार डिव्हायडरला धडकली, ५ वर्षांच्या चिमुरडीसह दोघांचा मृत्यू

रांजणी फाट्याजवळ घडली घटना

बीड : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील लोणारे कुटुंब तुळजापूरला दर्शनाला जात होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने त्यांची कार डिव्हायडरवर जोरदार धडकली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना गेवराईजवळील रांजणी फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर येथील लोणारे कुटुंब तुळजापूर येथे देवदर्शनाला जात होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने गाडी थेट गेवराईजवळ असलेल्या रांजणी फाट्याजवळ असलेल्या डिव्हायडरला धडकली. अपघातात श्रावणी योगेश लोणारे (४), शंभू योगेश लोणारे (१.५), समर्थ योगेश लोणारे (१०), पूजा रामेश्वर लोणारे (२८), रामेश्वर पोपट लोणारे (३७), पूनम योगेश लोणारे (३७), ईश्वरी रामेश्वर लोणारे (५), दत्तात्रय सोमनाथ आडभाई (४५) हे आठ जण जखमी झाले. तर योगेश पोपट लोणारे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर यातील ईश्वरी रामेश्वर लोणारे या ५ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर होती. उपचारा दरम्यान काल दुपारी १२.०० च्या दरम्यान तिचाही मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकसेवा मंडळाचे नारायण पवारसह आदींनी मदत केली. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR