लातूर : प्रतिनिधी
यु-टर्न घेत असलेल्या कारला जोराची धडक बसून दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शहरात रविवारी पहाटे अंबेजोगाई रोडवरील शारदा इंटरनॅशनल स्कुलच्या समोर घडली होती. या अपघातात नहुश राहूल पाटील या तरुणाचा मृत्यू झाला होता तर नरेंद्र अर्जुन जाधव गंभीर जखमी होता. दरम्यान रविवारी रात्री उशिरा जखमी नरेंद्र जाधवचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम. एच. २४ बी. सी. ००९६ वरून नहुश राहुल पाटील वय २३ वर्षे, रा. सास्तूर, ता. लोहारा आणि नरेंद्र अर्जुन जाधव, वय २३ वर्षे, रा. मित्रनगर लातूर हे दोघे रेणापूर नाक्याकडून लातूर शहरात येत असताना अंबेजोगाई रोडवरील शारदा इंटरनॅशनल स्कुलच्या समोर इनोव्हा गाडी क्रमांक एम. एच. २४ बी.९९९० चा चालक यु टर्न घेत असताना दोन्ही वाहनात जोराची धडक झाली यात नहुष पाटील याचा मृत्यू झाला तर नरेंद्र जाधव हे गंभीर जखमी झाला होते. त्यांचा ही रविवारी रात्री उशिरा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून या अपघातात दोन उमद्या तरूणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहह व्यक्त केली जात आहे.