27.1 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeधाराशिवकावलदरा परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ

कावलदरा परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ

शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

धाराशिव : तालुक्यातील कावलदरा राष्ट्रीय महामार्गालगत चार चाकी गाडी समोरून बिबट्या निघून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आढळून आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी रात्री उशिरा रवाना झाले आहेत.

त्यामुळे परिसरातील शेतकरी तसेच गावातील रहिवासी यांनी सावध राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्या आढळून येत आहे तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे व वासरे या बिबट्याने फाडल्याच्या घटना घडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हे त्यातच मंगळवारी दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील बावी कावलदरा या राष्ट्रीय महामार्ग लगत एका चार चाकी गाडी समोरून हा बिबट्या पसार झाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी हा बिबट्या पाहिला. त्यामुळे हे बातमी वाऱ्यासारखे सर्वत्र पसरली वन विभागासही खबर देण्यात आली. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी या बिबट्याच्या शोधात रात्री उशिरा घटनास्थळाकडे रवाना झाले त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी रात्री सावध राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR