23.4 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeराष्ट्रीयकाश्मिरात वादळी तडाख्यात हवेतच विमानाचे हेलकावे

काश्मिरात वादळी तडाख्यात हवेतच विमानाचे हेलकावे

 

२२७ प्रवाशांचा जीव टांगणीला, श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

श्रीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून राजधानी दिल्लीतही वातावरण फिरले आहे. कारण मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यातच आज दिल्लीतून श्रीनगरला जाणारे विमान वादळी वा-याच्या सपाट्यात आल्याने श्रीनगर विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यामुळे या विमानातून प्रवास करणा-या २२७ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

विमान प्रवासी वाहतुकीत विमान कंपन्या आणि शासनाच्या उड्डाण मंत्रालयाकडून विशेष काळजी घेतली जाते. त्यात पावसाळ््याच्या दिवसांत विमान कंपन्यांना व विमानसेवेला महत्त्वाचे संदेशही सातत्याने दिले जातात. त्यामुळे दिल्ली-श्रीनगर विमान प्रवासात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. इंडिगोच्या या विमानातील सर्वच २२७ प्रवासी सुखरुप असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले.

इंडिगो विमानच्या या उड्डाणाचे ट्रॅकिंग पाहिल्यास हे विमान वादळात सैरभैर झाले होते. आकाशातील वादळात विमान गोल-गोल फिरत असल्याचे लक्षात येताच विमानातील क्रू मेंबर आणि पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एअरपोर्ट अधिका-यांच्या म्हणण्यांनुसार विमानाचे इमर्जन्सी लँडिग करताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, तसेच सर्व सूचना व मानकांचे पालन करण्यात आले.

बर्फाचा पाऊस आणि गारपीट
दिल्ली ते श्रीनगर हवाई मार्गावर विमानाचा प्रवास सुरू असताना, बर्फाचा पाऊस आणि गारा पडत होत्या. त्यामध्ये विमानाच्या पुढील बाजूच्या काही भागाचे नुकसान झाले. विमान आकाशात हेलकावे घेत असताना प्रवाशांची धाकधूक वाढली होती. मात्र, फ्लाईट पायलट आणि केब्रिन क्रू मेंबर्सने सर्वच सूचना व नियमांचे पालन करत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR