लातूर : प्रतिनिधी
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. आर. एस. शिंदे यांना किडनी स्टोन व दाहकविरोधी औषधासाठी केलेल्या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. त्यांनी १, ३.५ ट्रायझिन पायराझोलिन्स एक दाहकविरोधी आणि अँटीयुरोलिथिक एजंट यांचा सखोल अभ्यास केला व त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे.
त्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, डॉ. युवराज सारणीकर, डॉ.जमन अंनगुलवार, डॉ. नंदिनी कोरडे, डॉ. आण्णाराव चौगुले, डॉ. श्रेयस माहुरकर, प्रा. राहुल जाधव, डॉ. नाथराव केदार, डॉ. श्याम इबाते, प्रा.किरण भिसे, डॉ. विश्वनाथ मोटे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.