34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्यात आक्षेपार्ह गाणी वाजविण्यास मनाई

लातूर जिल्ह्यात आक्षेपार्ह गाणी वाजविण्यास मनाई

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिलह्यात ‘हर टोपीवाला भी सर झुकाके जय श्रीराम बोलेगा’ ‘मंदिर वही बनायेंगे’, ‘तेरे मक्का और मदिना में शिव का डंका बजता है’, ‘दूर हटाओ अल्ला वालो’ सारखी आक्षेपार्ह गाणी किंवा इतर आक्षेपार्ह गाणी सार्वजनिक ठिकाणी वाजविणे, त्या गाण्याची सीडी, कॅसेट सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे व ताब्यात ठेवणा-यावर श्रीरामनवमी सणानिमित मिरवणुकीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. धार्मीक व सामाजिक शांततेला बाधित करणारे कोणतेही कृत्य करण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे. संपुर्ण जिल्हाभर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ची अधिसूचना लागू करण्यात आली.  हे आदेश १७ एप्रिलचे ००.०१ वाजता पासून ते १७ एप्रिलचे या २४.०० वाजेपर्यंत लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR