22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रकिती वेळा रडणार, लोकांची सहानुभूती आता संपलीय

किती वेळा रडणार, लोकांची सहानुभूती आता संपलीय

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून त्यांना महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बदलत नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. यावरून बच्चू कडू यांनी खोचक शब्दांत नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. ‘किती वेळा रडणार, लोकांची सहानुभूती आता संपलीय’ असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘जनतेचे उत्तर काही वेगळे असून, त्या जनतेच्या न्यायालयात हरणार आहेत. रडणे म्हणजेच सहानुभूती मिळवणे. पण आता ती सहानुभूती संपली असून, तुम्ही किती वेळा रडणार आहात. निवडणुकीत रडणे चांगले नसते. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडला असतात तर आम्हाला त्याची कीव वाटली असती. तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत असाल तर हेच दुर्दैवी आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

उच्च न्यायालयाचा तब्बल १०८ पानांचा निकाल होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते सर्व काही बाजूला ठेवून निकाल दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निकाल लागण्याच्या आधीच निकाल लागला असे म्हणाले होते. निकाल लागण्याच्या आधीच बावनकुळे म्हणतात निकाल आमच्या हाती आहे, एवढी जर तानाशाही सुरू असेल, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा न्यायालयावर विश्वास आहे, तो विश्वास असा पायदळी तुडवला जात असेल, तर सर्व काही संपल्यात जमा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR