22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरकिरकोळ बाजारात भाजीपाला कडाडला 

किरकोळ बाजारात भाजीपाला कडाडला 

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता तीव्र झाली असून पाण्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली असून किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सध्या किरकोळ बाजारात ग्राहकांना एक किलो मिरचीसाठी नव्वद रुपये, शेवगा, वाटणा या भाज्यांसाठी प्रत्येकी एक किलोसाठी ८० ते ९० रुपये, वांगी, काकडी, दुधीभोपळे या भाज्यांसाठी ८० रुपये मोजावे लागत आहेत. जवळपास सर्वच भाज्या १३० रुपये किलो या दराने किरकोळ विक्री होत आहे.
वाढते तापमान आणि आवकाळी पाऊसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी, बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त परिणाम भाज्यांवर होत असून दर नियंत्रणात नाही. पाणि टंचाईमुळे महात्मा फुले बाजार समितीत भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असल्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दरामध्ये तर मागील महिन्याच्या तुलनेत ३० ते ४० रुपयांनी वाढ झाल्याने ग्राहकांचे नियोजन बिघडले आहेत. यंदा अल्प पावसामुळे ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
 जिल्ह्यातील ग्रामिण भागात पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनाचीे लक्षणिय घट झाली आहे. त्यामुळे बाजार शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक गेल्या महिना भरापासून रोडावली आहे. आवक कमी असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. भेंडी, कोबी, वांगी अशा सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारामध्ये सध्या शेवगा, वाटणा या भाज्या ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत. वांगी, काकडी, टमाटो, मिरची, पत्ता गोभी आदी भाज्या ७० ते ८० रुपये दराने विकल्या जात आहेत. मेथी, पालक, शेपु ६० ते ७० रुपये जुडीच्या दराने मिळत आहे. टोमॅटो, गाजरचे दर ४० रुपये किलोवर गेले आहेत. इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या आहेत.
उन्हाळ्यात ल्ािंबाची मागणी जास्त प्रमाणात असल्याने ल्ािंबू ९० ते १०० रुपये दराने विकले जात आहे. तर अजुन काही दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला आहे.  शहरातील बाजारपेठेत ग्रामिण भागातून भाज्यांचे मोठया प्रमाणात उत्पादन होते. मिरची, कोथ्ािंबीर, फुलकोबी, पालक, मेथी आदी भाज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र गेल्या काही दिवसापासून बाजारपेठेत ही आवकच घटल्याने किरकोळ बाजारात दर काडाडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR