21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयकिरकोळ महागाई दर तब्बल ५.५ टक्क्यांवर

किरकोळ महागाई दर तब्बल ५.५ टक्क्यांवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महागाईने सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला आहे. सरकारने नोव्हेंबर महिन्याची किरकोळ चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार भारताचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर ५.५ टक्क्यांनी वाढला आहे तर ऑक्टोबरमध्ये हा महागाई दर ४.८७ टक्क्यांवर होता. वित्त मंत्रालयाने नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ आणि खाद्यपदार्थांच्या महागाईची आकडेवारी शेअर केली. त्यानुसार ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महागाई वाढली आहे. केंद्र सरकार महागाई नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. मात्र, महागाई रोखण्यात अद्याप यश आलेले नसल्याचेच चित्र आहे.

दुसरीकडे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई ८.७ टक्के झाली आहे तर ऑक्टोबरमध्ये ती ६.६ टक्के होती. रॉयटर्सच्या सर्वेक्षण अहवालात अन्नाच्या किमतीतील अस्थिरतेमुळे किरकोळ चलनवाढ अनुक्रमिक आधारावर ८० अंकांपेक्षा जास्त म्हणजेच ५.७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात डिसेंबरच्या धोरण बैठकीत आरबीआयने चलनवाढीचे लक्ष्य ५.४ टक्क्यांवर कायम ठेवले होते. ऑगस्टच्या धोरणात आरबीआय एमपीसीने आर्थिक वर्ष २०२४ साठी महागाई ५.१ टक्क्यांवरून ५.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी किरकोळ महागाई किंवा सीपीआय डेटा तिस-या तिमाहीत ५.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.२ टक्के असा अंदाज व्यक्त केला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत सीपीआय महागाई दर ५.२ टक्के, दुस-या तिमाहीत ४ टक्के आणि तिस-या तिमाहीत ४.७ टक्के असा वर्तवला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सेंट्रल बँकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये चलनवाढीचा दर ५ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी लक्षणीय वाढ नोंदवली आहे. मात्र, ४ टक्के सीपीआयचे उद्दिष्ट अद्याप साध्य झालेले नाही, असे सांगत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत चिंता व्यक्त केली.

महागाई रोखण्याचे
सरकारसमोर आव्हान
किरकोळ महागाई वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ डिसेंबरला संसदेत सांगितले होते की, किरकोळ महागाई दर स्थिर आहे. परंतु काल जाहीर झालेल्या आकडेवारीने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. ही महागाई कमी करणे सरकारपुढे आव्हान असेल, असे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR