17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरकिल्लारी कारखान्यास गतवैभव मिळेल

किल्लारी कारखान्यास गतवैभव मिळेल

किल्लारी : महेश उस्तुरे
आमदार अभिमन्यू पवार व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या भागातील शेतक-यांना हक्काचा कारखाना सहकारात सुरू करून दिला आहे. यामध्ये कोणी राजकारण आणू नये ते किल्लारी कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे करतील, आमदार अभिमन्यू पवार किल्लारीला पुर्णरवैभव मिळवून देतील, असा विश्वास नानीजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी व्यक्त केला आहे. (दि.२५) नोव्हेंबर रोजी किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा ४० व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मंचावर पाचवे पीठाधिपती नाथ संस्थान औसा हभप गुरुबाबा महाराज औसेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे, हभप दतात्रय पवार, संताजी चालुक्य, सौ शोभा अभिमन्यू पवार, सरपंच सौ.सुलक्षणा बाबळसुरे, प्रवीण फडणवीस, उपनिबंधक सहकारी संस्था एस.आर नाईकवाडे, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, प्रा सुधीर पोतदार, किरण उटगे, सुहास पाचपुते, संतोष बेंबडे, सुनील उटगे, काकासाहेब मोरे, युवराज बिराजदार, विजयकुमार सोनवणे, किरण गायकवाड, अ‍ॅड परिक्षीत अभिमन्यू पवार, निवृत्ती भोसले, रमेश हेळंबे, एस. आर. वाडीकर, माजी एम.डी.तुकाराम पवार यांची उपस्थित होते.

प्रारंभी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज पुढे म्हणाले की, आजारी अवस्थेतील किल्लारी कारखाना आमदार अभिमन्यू पवार यांनी उर्जितावस्थेत आणून त्याला सुरू करीत आहेत. त्यामुळे सर्व शेतक-यांनी सहकार्य करीत कारखाना जीवन ठेवायचा आहे. उपकुख्यमंत्री अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभा राहिल्याने हा कारखाना सुरू होत असून त्याला संजीवनी मिळाली आहे. आता हा कारखाना टिकविण्यासाठी सर्व शेतक-यांंनी सहकार्य करावे हा कारखाना तुमचा आहे. या कारखान्यामुळे तालुक्यातील विकासाला चालना मिळणार आहे. आमदार अभिमन्यू पवार व माझे नाते वेगळे असून ते माझे लाडके आहेत. या भागाच्या विकासासाठी सर्वानी त्यांच्या पाठीशी उभे राहावे कारण या भागाच्या विकासासाठी सत्ता आवश्यक आहे, आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे दृष्टी आहे आणि ती दृष्टी घेऊन ते काम करतात, असे ते म्हणाले. यावेळी शेतकरी सभासदासह स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक आर.एस.बोरावके यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड श्रीधर जाधव यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR