किल्लारी : महेश उस्तुरे
यावर्षी निळकंठेश्वराची महापूजा करून यात्रा मूर्तीची स्थापना आमदार अभिमन्यू पवार याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्याच्या सोबत त्याच्या पत्नी शोभाताई पवार, आमदार सिद्धु पाटील हुमानाबाद, आर्चनाताई पाटील चाकूरकर, सरपंच सुलक्षणा बाबळसुरे या होत्या त्यांचा सत्कार देवस्थानच्या वतीने करण्यात आला.
ही यात्रा दि १ ऑगस्ट ते रविवार ते २० आगष्ट बुधवारपर्यत ११ दिवस चालणार आहे.सकाळी ९ वाजता नविन किल्लारी’ निळकंठेश्वर मंदीरापासुन पालखी सोहळा सुरू झाला ढोल ताशा, टाळ मृदंग,च्या आवजात सर्वांच्या हाती पताका घेऊन ॐ नम: शिवाय, हरहर महादेव, शिव शिव संब सदाशीव या मंत्रोच्यारात किल्लारी पाटी मार्गे जुने गाव निळकंठेश्वर मंदीरापासून तीन किलोमिटरवर असलेल्या ईश्वर दोह येथील शिवलींग पिंडीस भेटून देऊन परत निळकंठेश्वर मंदीरात येऊन महापूजा भजन आरती करून आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते होऊन यात्रा मूर्ती स्थापन होऊन यात्रेस सुखात झाली.
जवळपास दहा किलोमिटर पालखी सोहळा झाला. पालखी सोहळ्यात हजारोच्या संखेत भावीक पुरुष, महिला सहभागी होत्या. रस्तावर रांगोळी काढून पालखीला नारळ फोडुन बेल फुले उधळण करून जागोजागी स्वागत करण्यात आले. या यात्रेची देवस्थान कमेटीने जय्यत तयारी केली आहे. या निमित्ताने दररोजची महापूजा, आ. प्रवीण स्वामी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, पाशा पटेल, श्रीशैल्य उटगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पोलिसउपधीक्षक गणेश किद्रे, माजी मंत्री बस्वराज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, विविध विभागाचे मान्यवर अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी सपोनी विशाल शहाणे व फौजफाटा घेऊन पालखीसोबत स्वता: बंदोबस्त करीत होते. त्यानी पालखी सोबत पोलीस कर्मचारी पिएसआय आशोक ढोणे, पिएसआय गोपाळ शिंदे, एएसआय किसन मरडे, कालिदास फुगटे, ट्राफिक पोलीस दत्ता जाधव, कृष्णा गायकवाड, रवि करके, बालजी नटुरे, बालजी कांबळे, माळी, कमाल शेख, महीला पोलीसांना घेऊन चोख बंदोबस्त
ठेवला.