किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी दालनाचा थाटात शुभारंभ

लातूर : प्रतिनिधी
‘जे जे नवे, ते ते लातूरला हवे’ हा ध्यास जपणा-या लातूर शहरात ‘किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी’ अशा नामांकित ब्रँडचे दालन सुरू होणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. लातूर शहर प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, येथील ग्राहकांची वाढती क्रयशक्ती, बदलती जीवनशैली आणि दर्जेदार उत्पादनांना मिळणारी पसंती यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ब्रँड लातूरमध्ये आपला विस्तार करीत आहेत. हे शहराच्या आर्थिक प्रगतीचे आणि वाढत्या लौकिकाचे द्योतक आहे, असे यावेळी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नमूद केले. हरी कृष्णा समूह आणि लातूर येथील ईटकर व्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहरातील भारतरत्न राजीव गांधी चौक परिसरात सुरू करण्यात आलेल्या ‘किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी’या भव्य दालनाचा शुभारंभ माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आला.
यावेळी ह.भ.प. परमपूज्य गहिनीनाथ महाराज, हरी कृष्णा समूहाचे घनश्याम ढोलकीया, खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. परीक्षित अभिमन्यू पवार, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, सीए सुनील कोचेटा, सुधीर इटकर, राघवेंद्र इटकर, प्रितम सुधीर इटकर, आयुष राघवेंद्र इटकर, रवी इटकर, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन किरण जाधव, समद पटेल, दीपक सुळ, डॉ. सतीश बिराजदार, व्ही. पी. पाटील, पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, अभिजीत गिल्डा, अमित गिल्डा, डॉ. अरविंद भातांबरे, अजित माने, जयप्रकाश दगडे, राजकुमार कत्ते, केतन हलवाई, सतीश साळुंखे, भालचंद्र सोनकांबळे, गोटू यादव, हरिदास गडगडे, श्रीशैल   गडगडे, बंडू किसवे, मनोज चिखले,  चक्रधर शेळके, आनंद वैरागे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, इटकर कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News| माहूरच्या दत्त मांजरीत २०० हून अधिक गांजाची झाडे जप्त;एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल
01:50
Video thumbnail
Nanded News | माहूरमध्ये ८३ किलो गांजा जप्त; ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ११८ झाडे उद्ध्वस्त
02:27
Video thumbnail
Latur News |आमदार अमित देशमुखांच्या हस्ते किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे उद्घाटन
09:08
Video thumbnail
Latur News | पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाची कारवाई; २५ जणांना दंड, २६७ जणांना नोटिसा
02:05
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42

Latest news