33.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमनोरंजन‘कीर्तन’ रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!

‘कीर्तन’ रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!

मुंबई : प्रतिनिधी :
ग्लॅमरस आणि मनोरंजनप्रधान विषयांपासून वेगळ्या वाटेवरचा एक अनोखा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या ‘कीर्तन’ या आगामी चित्रपटाविषयी सध्या चित्रपटसृष्टीत विशेष चर्चा सुरू असल्याचे ऐकिवात येत आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाईल असे जाणकार सांगत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘अतुल जगदाळे प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली होत असून, तो आतापासूनच उत्कंठतेचा विषय ठरला आहे.

‘कीर्तन’ हा चित्रपट केवळ संतपरंपरेवर आधारित धार्मिक चित्रपट नसून, त्याला एक भव्य दृष्टिकोन देण्यात आला आहे. ‘कीर्तन’ म्हटलं की ओघाने संगीत-लोकसंगीत आलंच. तसेच या भव्य चित्रपटात कोणकोणत्या दिग्गज कलावंतांची वर्णी लागणार आहे याविषयीसुद्धा कमालीचे औत्सुक्य आहे. निर्माते-दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी यासंदर्भात गुप्तता राखली असली तरी ‘लवकरच मोठी घोषणा होईल’ असे त्यांनी संकेत दिले आहेत.

‘गणवेश’च्या यशानंतर नवा प्रयोग!
‘गणवेश’ या सामाजिक आशयाच्या चित्रपटानंतर तीन-चार वर्षांपासून अतुल जगदाळे यांनी एका भव्यदिव्य हिंदी चित्रपटावर काम सुरू केले आहे. त्यासोबत मराठी माणसाला प्रिय असलेले ‘कीर्तन’ भव्य रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयोग करत आहेत. त्यांच्या ‘गणवेश’मध्ये दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR