25.4 C
Latur
Saturday, February 15, 2025
Homeराष्ट्रीयकुंभमेळ्याला जाणा-या भाविकांच्या वाहनाला अपघात; १० ठार

कुंभमेळ्याला जाणा-या भाविकांच्या वाहनाला अपघात; १० ठार

लखनौ : वृत्तसंस्था
कुंभमेळ्याला जाणा-या भाविकांची कार आणि बसच्या भीषण अपघातात तब्बल १० भाविकांवर काळाने घाला घातला. ही घटना प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर मेजा परिसरात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. या अपघातात १२ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

छत्तीसगडमधील भाविक प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरून बोलेरो गाडीने कुंभमेळ्याला जात होते. यादरम्यान मेजा परिसरात मध्य प्रदेशहून येणा-या भाविकांनी भरलेल्या बस आणि कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १२ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. या अपघातात बोलेरोमध्ये प्रवास करणा-या १० भाविकांचा मृत्यू झाला. बसमध्ये प्रवास करणारे काही जण जखमी झाले आहेत. या अपघातात बोलेरो पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.

पोलिसांनी जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी १० जणांना तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर प्रयागराजचे पोलिस आयुक्त तरुण गाबा आणि जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मंधाड यांनीही घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. अपघातात मृत्यू झालेले बोलेरोमधील भाविक हे छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होते. तर अपघातात जखमी झालेले बसमधील प्रवासी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR