18.9 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रकुडाळमध्ये आढळला ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’

कुडाळमध्ये आढळला ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मलबार ग्लायडिंग फ्रॉग या दुर्मिळ बेडकाचे दर्शन झाले आहे. कुडाळ तालुक्यातील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड लाईफटाईम हॉस्पिटल’मध्ये वन्यजीवप्रेमीला हा बेडूक आढळला.
सामान्यत: पावसाळी हंगामात आढळणारा हा बेडूक डिसेंबर महिन्यात दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारा बेडूक आहे. हवेत उडत जाणारा बेडूक म्हणून याची ओळख आहे. मात्र, दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्येच प्रामुख्याने याचा अधिवास आहे. कुडाळ तालुक्यातील धामापूर परिसरातही याची नोंद झाली आहे. मात्र, १ डिसेंबर रोजी ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड लाईफटाईम हॉस्पिटलच्या आवारात ‘मायक्रोबायोलॉजी लॅब टेक्निशियन’ पदावर काम करणा-या जागृती सावंत यांना या ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’चे दर्शन झाले.

पावसाळी हंगामात प्रामुख्याने दिसणारा हा बेडूक वर्षातील नऊ महिने शीतनिद्रेसाठी झाडांच्या उंच फांद्यांवर जातो. मात्र, त्याचे डिसेंबर महिन्यात झालेले दर्शन आश्चर्याचे होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR