मुंबई : प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. यावर अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनीही ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर कुणाल कामराचा एक व्हीडीओ शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.
दरम्यान, सत्ताधारी कुणाल कामरावर भडकले असले तरी विरोधकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
या व्हीडीओमध्ये त्याने राज्यातील मेट्रोचे काम, रस्त्यांची दुर्दशा या मुद्यांवरून सरकारला टार्गेट केले आहे. यावर राजू पाटील यांनी ‘धन्यवाद, कुणाल कामरा आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ’ असे म्हटले आहे.
कुणाल कामराला दुस-यांदा समन्स
एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणारा
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला पोलिसांनी दुस-यांदा समन्स पाठवले आहे. कामराने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला होता. परंतु पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली आहे. मुंबई पोलिसांनी कुणालला मंगळवारी पहिली नोटीस पाठवली होती