मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या विधानावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळात, शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी एक मोठे विधान केले आहे.
उद्धव म्हणाले की, मला वाटत नाही की कुणाल कामराने काही चुकीचे म्हटले आहे. कुणाल कामराने काहीही चुकीचे केलेले नाही. जो गद्दार आहे… तो गद्दार आहे. हे कोणावरही हल्ला करण्याबद्दल नाही. तुम्ही संपूर्ण गाणे ऐका आणि इतरांनाही ऐकवा… या हल्ल्याशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. हे गद्दार सेनेने केले आहे… ज्यांच्या रक्तात ‘गद्दारी’ आहे ते कधीही शिवसैनिक असू शकत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नागपूर दंगलींचा कथित सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. यावर, सर्वत्र समान न्याय द्या, दंगली भडकवणा-यांवर तुम्ही काय कारवाई कराल? असा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा सवाल केला आहे.