जालना : प्रतिनिधी
जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील गांधीनगर भागात ही घटना घडली. संध्या प्रभुदास पाटोळे असे मयत मुलीचे नाव आहे.
संध्या पाटोळे ही चिमुकली अंगणात खेळत असताना तिच्यावर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला करत तिचे लचके तोडले. यात चिमुकल्या संध्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील गांधीनगर परिसरामध्ये संध्या ही चिमुकली सकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर असलेल्या मैदानावर खेळण्यासाठी गेली. खेळण्यासाठी गेल्यानंतर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संध्या गंभीर जखमी झाली आणि नंतर उपचारासाठी दवाखान्यात नेत असता तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.