जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील कुणकी येथील दशरथ नारायण तिडके यांच्या शेताच्या शेजारील जळकोट नगरपंचायतीच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे सदरील शेतक-याच्या शेतातील तुषार चे ३६ पाईप, जन हस्ती पाईप ६० फूट जनावराचा चारा (कडबा) १२०० नग, एक गुळीचा ढिग, तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना दि १२ रोजी दुपारच्या सुमारास घडली . पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सदरील शेतक-याने तहसीलदार जळकोट यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .