25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्र‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवानाने घेतला गळफास

‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवानाने घेतला गळफास

सांगली : प्रतिनिधी
जिल्ह्यातील युवा पैलवान सूरज निकम याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज निकम हा ‘युवा महाराष्ट्र केसरी’ पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणा-या सूरज निकमने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागनाथनगर, नागेवाडी येथे राहत्या घरी सूरज निकमने आत्महत्या केली होती. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान सूरज निकमच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणात आता सूरज निकमच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सूरज निकम हा नामवंत मल्ल होता. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकावले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR