17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरकुरियर पाकिटात दडलंय लातूरच्या नीट प्रकरणाचे गुपीत!

कुरियर पाकिटात दडलंय लातूरच्या नीट प्रकरणाचे गुपीत!

लातूर : प्रतिनिधी
नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत पोहचल्याने देशभरात चर्चेला आलेल्या लातूरात दाखल झालेल्या सीबीआय पथकाने आरोपींना ताब्यात घेत या प्रकरणाचा लातूरात विविध अंगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचे गुपीत एका कुरियर पाकीटात दडल्याचे  बोलले जात असून हे कुरीअर पॉकीट कोणी कोठे पाठवले हे जरी समोर आले नसले तरी याचा शोध मात्र घेतला जात असल्याचे समोर येत आहे.
लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफुटीच्या नवीन कायद्यानुसार संजय जाधव व जलीलखॉ पठाण या दोन शिक्षकासह धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर मुंढे नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील  चार संशयीत आरोपी पैकी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलिसांनी गजाआड केले असून ते सध्या सबीआयच्या कोठडीत आहेत. तर या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार असलेला सध्या लातूर शहरात वासत्व्यास असलेला व मुळ रा. देगलूर, जि. नांदेडचा  धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक असलेला ईरन्ना मष्णाजी कोनगलवार ंहा आपल्या कुटूंबासह अद्यापही फरारच आहे. तर दिल्लीच्या गंगाधर नामक आरोपीला सीबीआयने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
असे असतानाच मंगळवारी न्यायालयाने या गुन्ह्यातील अटक असलेल्या संशयित आरोपी संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ पठाण यांना सीबीआय कोठडी सुनावल्यानंतर सीबीआयने लातूरात विविध अंगाने तपास सुरू केला आहे.  यातच याप्रकरणाचे गुपीत एका कुरीयर पाकीटात दडल्याचे समोर येत असून या कुरीअर पाकीटातून आरोपींनी काही आक्षेपाहार्य कागदपत्रे पाठवली असावीत असा संशय असून या कुरीअर बाबतीत चौकशी केली जात असल्याचे ही बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR