लातूर : प्रतिनिधी
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो कितपत सत्य आहे हे माहीत नाही. या संदर्भात आज कृषी मंत्री कोकाटे यांनी सदरील व्हिडीओ संदर्भात खुलासा ही केला आहे. मी त्यांची भेट घेऊन या व्हीडीओ संदर्भात त्याच्याकडून जाणून ही घेणार तर आहेच पण राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतक-याचे हित जोपासले पाहीजे असे ही लातूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पुर्व तयारीसाठी मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. त्यांनी यावेळी लातूर येथील आयोजित पव्कार परिषदेत बोलतााना राज्यात आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे निर्घार नव पर्वाचा हा संकल्प घेऊन आपण मराठवाड्याच्या दौ-यावर आलो असून या दौ-याला कार्यकर्त्यांचा उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे. संघअन वाढीसाठी पक्ष कार्यकर्त्यांची सभासद नोंदणी व पख पदाधिकारी नेमणूका केल्या जात आहेत. महायुतीसंदर्भात बोलायचे झाले तर समन्वय समिती बसून यावर निर्णय घेईल असे सांगत त्यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढ दिवस जनसप्ताह म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगितले.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहातील पावसाळी अधिवेशना दरम्यान रमी खेळतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो कितपत सत्य आहे हे मला माहीत नाही. या संदर्भात आज कृषी मंत्री कोकाटे यांनी सदरील व्हिडीओ संदर्भात खुलासा ही केला आहे. मी त्यांची भेट घेऊन या व्हीडीओ संदर्भात त्याच्याकडून जाणून ही घेणार आहेच यापुर्वी ही त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी त्याना समज ही दिली आहे. पण राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतक-याचे हित जोपासले पाहीजे असे ही त्यांनी या प्रसंगी
सांगितले. या पत्रकार परिषदेला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, रूपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.