23.4 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeलातूरकृषी सहायकांचे आंदोलन 

कृषी सहायकांचे आंदोलन 

लातूर : प्रतिनिधी
लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीर, धाराशिव येथील कृषि सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्यावतीने लातूरच्या विभागीय कृषि सहसंचालक कार्यालया समोर बुधवारी आंदोलन केले. कृषि सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करावे, कृषि विभागातील संपूर्ण कामकाज डिजीटल स्वरुपात होत असल्याने कृषि सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत. कृषि सेवक कालावधी रद्द करुन कृषि सेवकांना नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती करावे, कृषि सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषि मदतनीस द्यावेत.
 निविष्ठा वाटपात सुसत्रता यावी व वाटप परमीटद्वारे करावे, कृषि विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी दयावी व त्यामध्ये कृषि पर्यवेक्षकांचे पदे वाढवून कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दुर करावी. पोकरा योजनेमध्ये समुह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावीत. रोहयोच्या योजने अंतर्गत लक्षांक देताना क्षेत्रीय स्तरावरील आडचणीचा विचार करून लक्षांक देण्यात यावे. नैसर्गीक आपत्तीच्या पंचनामे करणे व तदनंतर करावयाच्या कामाबाबत महसुल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या जबाबदा-याबाबत योग्य न्यायसंगत कार्यपध्दती तयार करावी. कृषि सहाय्यक संवर्गाच्या आस्थापना विषयक अडचणींची सोडवणुक करण्यात यावी, आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात लातूरचे जिल्हाध्यक्ष ओमकार माने, सचिव शरद धनेगावे, नांदेडचे जिल्हाध्यक्ष शंकर पवार, सचिव दिलीप काकडे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष संतोष वाघमारे, सचिव श्रीनिवास शिंदे, परभणीचे जिल्हाध्यक्ष संदीप शेळके, सचिव बबन राठोड, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांच्यासह या जिल्हयातील कृषि सहाय्यक आंदोलनात सहभागी झाले होते.
………………….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR