19.3 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकृष्णा नदीत बुडाले तीन युवक

कृष्णा नदीत बुडाले तीन युवक

सांगली : कृष्णा नदीत गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जित करताना तीन युवक सरकारी घाटाजवळ बुडाले, त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले. आदित्य अजय रजपूत (वय १६) व अक्षय मनोज बनसे (१८, दोघेही रा. रामटेकडी, शिवाजी मंडईजवळ, सांगली) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. राज चव्हाण असे बचावलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. स्पेशल रेस्क्यू टीम, आयुष हेल्पलाईन व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडालेल्या युवकांचा शोध घेतला. पण रात्रीपर्यंत ते सापडले नाहीत. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.

शहरातील शिवाजी मंडईसमोर वाल्मिकी मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाकडून प्रतिष्ठापना केलेली गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. दुस-या वर्षी नवीन गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेपूर्वी गतवर्षीची मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा आहे. गुरुवारी मंडळाचे दहा ते बारा कार्यकर्ते गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी सरकारी घाटावर गेले होते. सहाजण मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात उतरले. सध्या कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली असून, पाण्याला मोठा वेग आहे.

नदीपात्रात काही अंतरावर मूर्ती सोडून कार्यकर्ते बाहेर पडू लागले. मूर्ती अजून विसर्जित झाली नसल्याचे पाहून पुन्हा कार्यकर्ते पाण्यात उतरले. पण पाण्यातून माघारी फिरताना तिघेजण बुडू लागले. एका मच्छिमाराने धाडसाने उडी घेऊन राज चव्हाण या युवकाला वाचविले. तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोव-यात अडकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR