लातूर : श्रीक्षेत्र आळंदी येथील व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील कार्य करणा-या कलावंतांना दिला जाणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार लातूर जिल्ह्यातील युवा कीर्तनकार लातूरमधील बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ह.भ.प. कृष्णा महाराज कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर झाला.
वारकरी संप्रदायातील प्रचार व प्रसार या माध्यमातून आध्यात्मिक वारकरी संप्रदायातील व्यक्त्ती म्हणून महाराजांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार येत्या २१ एप्रिल रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सर्वत्र कृष्णा महाराजांचे कौतुक केले जात आहे. बिर्ला इंग्लिश स्कूल मधील डायरेक्टर, प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाराजांचे कौतुक केले.