22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeमहाराष्ट्रकॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी

कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

अहिल्यानगर : प्रतिनिधी
अनेकदा या पॅकेटबंद खाद्यपदार्थांना विकताना दुकानदारांकडून ब-याचदा योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. कॅडबरी विकणा-या दुकानदाराने चॉकलेटचा साठा २५ डिग्रीपेक्षा कमी तापमानात ठेवल्याने त्याला बुरशी लागली होती. या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत कारवाई केली आहे.

शहरातील धूपर अँड सन्स या कॅडबरी वितरकाच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. छाप्यात विविध प्रकारच्या चॉकलेटचे तब्बल २५४ बॉक्सेस जप्त करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅडबरी कंपनीकडून स्टोरेजसंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असून चॉकलेटचा साठा २५ डिग्री सेंटीग्रेटपेक्षा कमी तापमानात ठेवणे आवश्यक आहे. मात्र वितरकाने हे नियम पाळले नाहीत. उलट उघड्यावर आणि अस्वच्छ ठिकाणी, भिजलेल्या भिंतीलगत ठेवलेले अनेक बॉक्सेस बुरशी लागलेल्या अवस्थेत आढळून आले.

कॅडबरी ब्रँडच्या विविध उत्पादनांमध्ये व्हेजिटेबल ऑईल आणि फॅटचा वापर केला जातो. त्यामुळे स्टोरेज कंडिशनचे पालन न झाल्यास या घटकांचे गुणवत्तेवर परिणाम होतात विशिष्ट तापमानात साठा न ठेवल्यास चॉकलेटमधील व्हेजिटेबल ऑईल आणि फॅट मेल्ट होतात, म्हणजेच खराब होऊन त्याचा दर्जा बिघडतो.

याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. या गंभीर उल्लंघनामुळे धूपर अँड सन्स या वितरकावर व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली असून कॅडबरी कंपनीलादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR