18.1 C
Latur
Monday, November 24, 2025
Homeराष्ट्रीयकेंद्राने पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविली

केंद्राने पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविली

जंगली प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार
अतिवृष्टी, पुराने झालेल्या पिकहानीची मिळणार भरपाई
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने शेतक-यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. नैसर्गिक संकटाने पिकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी ही योजना सुरू केली होती. यामध्ये आणखी दोन नुकसानाची भरपाई मिळणार असून, यापुढे जंगली जनावरांद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीने किंवा पुराने झालेली पिकहानी यांची नुकसान भरपाई शेतक-यांना मिळणार आहे.

या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली. शेतक-यांना याबद्दल खुशखबरी सांगताना सांगितले की, नैसर्गिक संकटाने होणा-या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ही पीक विमा योजना तयार केली होती. परंतु दोन प्रकारचे नुकसान कव्हर आतापर्यंत यात मिळत नव्हते.ज्याची मागणी शेतकरी ब-याच काळापासून करत होते.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, शेतक-याची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. शेतकरी जंगली जनावराच्या शेतातील नुकसान केल्याने आणि पूरजन्य परिस्थिती अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान यांचा पिक विम्यात समावेश नव्हता. नव्या व्यवस्थेत दोन्ही कॅटॅगरींना जोडून शेतक-यांना दिलासा दिला जाणार आहे. ते म्हणाले की, जर जंगली जनावरांना शेतीचे नुकसान केले तर आता भरपाई मिळणार आहे. तसेच अतिवृष्टीने शेतात पाणी भरल्याने पीक वाया गेले तरी नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हा निर्णय खास करून त्या क्षेत्रातील हजारो शेतक-यांना फायदा होणार आहे, जेथे दरवर्षी जंगली जनावरांचा धोका असतो किंवा जेथे मान्सूनदरम्यान पाणी साचल्याने पिके खराब होतात.

पंतप्रधानांच्या मंजूरीनंतर
नवे बदल लागू केले
केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पंतप्रधानांचे या निर्णयाबद्दल आपण शेतक-यांच्या वतीने आभार मानत आहोत. हे नवीन बदल शेतक-यांसाठी मोठा दिलासा आहे. यामुळे शेतक-यांनी उशीर न करता पीक विम्यासाठी अर्ज भरावा. कारण ही योजना आता अधिक व्यापक आणि समावेशी सुरक्षा प्रदान करणार आहे.

नैसर्गिक जोखिमेला कवच मिळणार
पंतप्रधान पीक विमा योजनेचा उद्देश शेतक-यांना किफायती दरात पीक विमा उपलब्ध करणे हा आहे. या योजनेंतर्गत पेरणीच्या पहिल्या फेरीपासून कापणीपर्यंत पिकांना गैर प्रतिबंधित नैसर्गिक जोखिमेला सुरक्षा दिली जाते. याचा हेतू कृषी उत्पादनांना सुरक्षित ठेवणे आणि शेतक-यांना व्यापक जोखीम कव्हरेज प्रदान करतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR