22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeसोलापूरकेंद्रीय गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ 'भीमशक्ती 'ने केली निदर्शने

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ ‘भीमशक्ती ‘ने केली निदर्शने

सोलापूर / प्रतिनिधी
राज्यसभेत संविधानाच्या संदर्भात चर्चा चालू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असंविधानिक भाषा वापरुन त्यांना आपमानित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने केली. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार आणि सुबोध वाघमोडे, राजाभाऊ कदम, उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमिला तुपलवंडे, अ‍ॅड. करिमुन्निसा बागवान, संध्या काळे, शोभा बोबे, सुखदेव साबळे, विक्रम वाघमारे, नागेश गायकवाड, समीर मुल्ला, माया कांबळे, भारत क्षीरसागर, मनोज लोंढे, रत्नमाला परदेशी, सुनंदा बडुरे, नसरीन शेख, विजयालक्ष्मी झाकणे, राजश्री साबळे, मुमताज शेख, छाया हिरवटे, मीना गायकवाड, के.एम. कांबळे, रफिक शेख, सलीम मुल्ला, गणेश चंदनशिवे, राजा नागटिळक, कीर्ती शिवशरण, मयुर तळभंडारे, अमोल रणश्रृंगारे, सोनु सुरते, बाबा कोने, विशाल कांबळे, प्रथमेश कदम, नितीन साळवे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR