32.2 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeक्रीडाकेकेआरने आरसीबीला चारली धूळ

केकेआरने आरसीबीला चारली धूळ

बंगळुरू : वृत्तसंस्था
कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा (आरसीबी) त्यांच्याच घरच्या मैदानावर ७ फलंदाज राखून पराभव केला. आयपीएल २०२४ मधील होम टीमने सलग ९ सामने जिंकले होते. अखेर हा सिलसिला केकेआरने तोडला.

आरसीबीचे १८३ धावांचे आव्हान केकेआरने १६.५ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. केकेआरकडून सुनिल नारायणने ४७, व्यंकटेश अय्यरने ५० तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ३९ धावांची खेळी केली. फिल्प सॉल्टने देखील ३० धावा करत दमदार सलामी दिली होती.

आयपीएल २०२४ च्या १० व्या सामन्यात आज आरसीबी आणि केकेआर एकमेकांना भिडत आहे. प्रथम फलंदाजी करणा-या आरसीबीने २० षटकात ६ बाद १८२ धावा केल्या. विराट कोहलीने दमदार ८२ धावांची खेळी केली तर दिनेश कार्तिकने शेवटच्या दोन षटकात धडाकेबाज फलंदाजी करत ८ चेंडूत २० धावा केल्या. आरसीबीच्या मधल्या फळीने मात्र निराशा केली. ग्रीनच्या ३३ अन् मॅक्सवेलच्या २८ धावांची खेळी सोडता इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR