लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून केलेल्या विकास कामांच्या आाधरे रेणापूर नगरपंचायतीची निवडणुक आम्ही जिंकु, अशा विश्वास प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
रेणापूर नगरपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने काँग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख बोलत होते. सदरील बैठकीस काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर शहर व ग्रामीण निरीक्षक जितेंद्र देहाडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंखे, रेणापूर नगरपंचायत निवडणूक निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
सदरील बैठकीत यापुर्वी जाहीर करण्यात आलेले रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रभाग निहाय पक्ष निरीक्षकांना नियुक्ती पत्राचे वाटप व त्यासोबतच लातूर ग्रामीण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून विश्वजीत पाटील, किसान सेल लातूर तालुका अध्यक्षपदी रामानंद जाधव, किसान सेल रेणापूर तालुका अध्यक्षपदी दीपक जगदाळे, भादा सर्कल विभाग प्रमुख म्हणून अॅड. असगर पटेल यांना निवडीचे पत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
रेणापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांना प्राधांन्य देत नागरिकांना न्याय देण्याच्या भुमीकेतून आम्ही सारे एकसंघपणे या निवडणुकीस सामोरे जात आहोत. एकीकडे भाजपवाल्याची निष्क्रियता व जनतेप्रती असलेली उदासिनता तर दुसरीकडे आम्ही केलेल्या विकास कामाच्या आधारे ही निवडणूक आम्ही जिंकू, असा विश्वास यावेळी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून रेणापूर नगरपंचायत निवडणूक संदर्भात नियोजन सांगून निवडणूकीतील मुद्यावर मार्गदर्शन केले.

