30 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeउद्योगकेळीच्या झाडापासून कागद, कापड निर्मिती

केळीच्या झाडापासून कागद, कापड निर्मिती

टोकियो : वृत्तसंस्था
केळी हे फळ जगभरात प्रसिद्ध आहे. केळीचा इतिहास पाहायला गेला तर प्रथम केळीची शेती पापुआ न्यू गिनीमध्ये केली असावी असे मानले जाते. आज केळीचे उत्पादन जगभरातील अनेक उष्णकटिबंधीय भागांत होते. केळीचे सुमारे ११० वेगवेगळे प्रकार आहेत. केळीच्या झाडापासून जपानमध्ये चक्क कापड आणि कागदही बनवले जाते.

जेव्हा आपण केळी म्हणतो, तेव्हा ती गोड व मऊ असलेली ‘डेजर्ट केळी’ असते. याशिवाय, ‘प्लॅन्टेन’ नावाची एक प्रकारची केळी आहे. ज्याचे फळ कडक आणि स्टार्चयुक्त असते. या प्रकारची केळी स्वयंपाकासाठी व विविध धाग्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. केळीमध्ये व्हिटामिन बी ६, व्हिटामिन सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. हे घटक शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

केळीतील पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी विशेषत: उपयुक्त ठरते. यामुळे केळीचा नियमित आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. जगभरातील १०७ हून अधिक देशांत केळीची लागवड केली जाते. प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत, ब्राझील, चीन, इक्वेडोर, आणि फिलिपाइन्सचा समावेश आहे. याशिवाय, इक्वेडोर, कोस्टारिका, फिलिपाइन्स, कोलंबिया आणि ग्वाटेमाला हे देश केळीच्या निर्यातीमध्ये आघाडीवर आहेत. केळीचा खाण्यासाठी वापर होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु केळीच्या झाडातून मिळणारे तंतू वापरून जपानी लोक कपडे आणि घरगुती वस्त्र बनवतात. इतकेच नव्हे तर केळीच्या तंतूपासून उत्तम प्रकारचा कागदही तयार केला जातो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR