36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाके. एल. राहुल लेकीच नाव ‘इवाहा’

के. एल. राहुल लेकीच नाव ‘इवाहा’

सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : वृत्तसंस्था
अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल. राहुलच्या यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री २४ मार्च रोजी झाली. अथियाने एका मुलीला जन्म दिला. नुकताच के. एल. राहुलने त्याची मुलगी आणि पत्नी अथियासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये राहुलने आपल्या लाडक्या लेकीचे नाव सांगितले आहे.

या फोटोमध्ये मुलगी राहुलच्या खांद्यावर त्याची लेक झोपलेली दिसत आहे. राहुलने त्याच्या मुलीचे नाव इवाहा ठेवले आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले झ्र आमची बाळ मुलगी, आमचे सर्वस्व, इवाहा झ्र देवाची देणगी. केएल राहुलच्या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सर्वप्रथम कमेंट केली. तिने या फोटोवर लव्हचा इमोजी पोस्ट केला. मलायका अरोराने देखील लव्ह इमोजी आणि डोळ्यांचे इमोजी पोस्ट केले आहेत.

दरम्यान, साऊथची अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने देखील अनेक हृदयस्पर्शी इमोजी पोस्ट केल्या आहेत. शोभिता धुलिपाला हिने देखील फोटोवर कमेंट केली आहे. तर एका चाहत्याने लिहिले झ्र नाव खूप गोंडस आहे सर. केएल राहुलची ही पोस्ट व्हायरल होत आहे. काही मिनिटांतच लाखो चाहत्यांनी फोटोला लाईक केले आहे.

केएल राहुल आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याने त्याच्या वाढदिवशीच चाहत्यांना हे सरप्राईज दिले आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचे २०२३ मध्ये झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR